अहमदनगर- रविवारी राहाता बाजार समितीत कांद्याला 2800 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांद्याची 13 हजार 238 गोणी आवक झाली. नंबर 1 ला 2400 ते 2800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1350 ते 2350 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 500 ते 1300 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या 3499 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 ते 168 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.