अहमदनगर- श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांद्याला 2451 रुपये क्विंटल तर सोयाबीनला 4250 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. 768 क्विंटल कांद्याची आवक झाली.
त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 1500 ते जास्तीत जास्त 2451 रुपये क्विंटल, नंबर 2 कांदा 900 ते 1450 व नंबर 3 कांदा 300 ते 850 तसेच गोल्टी कांद्याला 950 ते 1450 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले आहेत.
सध्या कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत. भुसार मार्केटमध्ये 18 क्विंटल मालाची आवक झाली. हरभर्याची 8 क्विंटल आवक होऊन 3650 ते 4000 व सरासरी 3850 रुपये क्विंटल भाव निघाला. सोयाबीनची 10 क्विंटल आवक होऊन 4000 ते 4250 व सरासरी 4525 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले.
भुसार लूज मार्केटमध्ये 3 साधनातून सोयाबीनची 25 क्विंटल आवक होऊन त्याला 4411 ते 5175 व सरासरी 4725 रुपये क्विंटल असे भाव निघाले.