अहमदनगर- मंगळवारी राहाता बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 2000 रुपये भाव मिळाला. तर डाळींबाला प्रति किलोला 200 रुपये भाव मिळाला
बाजार समितीत मंगळवारी 7761 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1500 ते 2000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 800 ते 1450 इतका भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 800 रुपये, गोल्टी कांद्याला 900 ते 1100 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा 100 ते 300 रुपये इतका भाव मिळाला.
डाळींबाच्या 5156 क्रेटस ची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 131 ते 200 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.
मुगाला कमीत कमी 6351 रुपये, जास्तीत जास्त 6681 रुपये, तर सरासरी 6516 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. गव्हाला सरासरी 2521 रुपये इतका भाव मिळाला. हरबरा सरासरी 4000 रुपये, ज्वारीला सरासरी 1824 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर मकाला सरासरी 1851 रुपये भाव मिळाला तर बाजरीला 2475 रुपये भाव मिळाला.