अहमदनगर- राहाता बाजार समितीत सोमवारी लूज कांद्याची मोठया प्रमाणात आवक झाली. कांदा नंबर 1 ला कमीत कमी 1051 तर जास्तीत जास्त 1350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 751 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 526 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 ते 800 रुपये भाव मिळाला.
सोयाबीनला कमीत कमी 4398 रुपये, जास्तीत जास्त 4875 रुपये, तर सरासरी 4650 रुपये. गव्हाला कमीत कमी 2401 रुपये तर जास्तीत जास्त 2535 रुपये, सरासरी 2470 रुपये. मुग सरासरी 5750 रुपये.
डाळिंबाच्या 3985 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 रुपये ते 160 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 76 ते 120 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.