अहमदनगर- गुरूवारी राहाता बाजार समितीत लूज कांद्याची चांगली आवक झाली. लूज कांद्याला 1966 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. नंबर 1 ला 1551 ते 1966 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1051 ते 1550 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 451 ते 1050 रुपये भाव मिळाला.
सोयाबीनला कमीत कमी 4100 रुपये तर जास्तीत जास्त 4358 रुपये, सरासरी 4250 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2100 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 3600 रुपये भाव मिळाला, मकाला सरासरी 1893 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. मुगाला 5925 रुपये भाव मिळाला.