कॉलेज कधी उघडणार याबबात सामंत यांनी दिली माहिती

1
44
expressmarathi

एक्स्प्रेस मराठी : राज्यातील महाविद्यालये मागील नऊ – दहा महिन्यापासून कोरोना मुळे बंद आहे आता अकरावी – बारावी व पाचवी ते आठवीचे वर्ग देखील चालू करण्यात आले असून अद्यापही महाविद्यालये चालू झालेले नाही आहेत मागील एक महिन्यापासून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. उदय सामंत साहेब हे कधी याबबात घोषणा करतील याकडे पूर्ण विद्यार्थी व पालक वर्गाचे लक्ष्य लागले आहे.

महाविद्यालये कधी उघडणार याबबात सामंत यांनी संगितले की राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक पार पडली असून दोन दिवसात तारीख जाहीर केली जाईल. याआधीही महाविद्यालये उघडन्याची तारीख ११ जानेवारीला जाहीर करण्यात येणार होती त्यांनातर २० जानेवारी पर्यन्त तारीख जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. आता येणार्‍या २ दिवसात महाविद्यालये कधी उघडणार याबबात निर्णय होतो की नाही यावर पूर्ण विद्यार्थी व पालक वर्गाचे लक्ष्य लागले आहे.  

हे देखील वाचा : राहुरी कृषि विद्यापीठाच्या वॉचमनचा आढळला मृतदेह ! नातेवाइकांनी केले गंभीर आरोप

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here