व्हायरल मेसेजचे सत्य
कोरोना लसीबाबत व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये मोदी सरकारकडून 5000 रुपये मिळण्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने तपास केला आणि मेसेज बनावट असल्याचे आढळले. PIB ने व्हायरल मेसेज शेअर केला आणि लोकांना हा मेसेज फॉरवर्ड न करण्याचे आवाहन केले. असे अनेक मेसेज सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असल्याची माहिती आहे, ज्यामध्ये ते सरकारच्या योजनेला एक साधन बनवून फसवणुकीचा बळी बनवतात. म्हणूनच लोकांना वेळोवेळी जागरुक केले जाते की कोणीही त्यांची वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नये. विशेषतः बँकेशी संबंधित माहिती विसरूनही शेअर करू नये.