खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी कारखान्याबद्दल केलेल्या मोठ्या घोषनेने उडाली खळबळ

0
32
खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी कारखान्याबद्दल केलेल्या मोठ्या घोषनेने उडाली खळबळ

राहुरी : खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी कारखान्याबद्दल केलेल्या घोषनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले की राहुरी मधील डॉ. बा.बा. तनपुरे साखर कारखान्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून देखील गळीत हंगाम सुरळीत सुरू नाही आहे हा अनसुरळीतपणा जर नैसर्गिक गोष्टीमुळे असता तर ते आपण मान्य देखील केले असते परंतु कारखान्यामध्ये नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित हलगर्जीपणा चालू आहे. बॉयलर मध्ये साखर व पाणी दिसत आहे हा मानवनिर्मित हलगर्जीपणा आहे. कुणाला तरी असे वाटते की हा कारखाना चालू नये, त्यामुळे आता येणारे पुढील 72 तास हा कारखाना नैसर्गिक आपत्ती वगळत जर सुरळीत चालला नाही तर खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्यातील संचालक मंडळ पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देतील, असा इशारा संचालक मंडळ, अधिकारी व कामगार यांच्या संयुक्त बैठकीत काल घेण्यात आला.

शनिवारी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत संचालकांची ही बैठक झाली. कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी खर्च करून दैनदीन गाळप क्षमता ३५०० मेट्रिक टनावरून ४२५० टनापर्यन्त वाढवली, गेल्या ६४ दिवसांपासून गळीत हंगाम चालू आहे या कलावधीत फक्त १५००० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. राहुरी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा लाख मेट्रिक टनापैकी सहा लाख मेट्रिक टनाची नोंद झाली आहे या ६४ दिवसांत सलग २४ तास कारखान्याचे गळीत चालू राहिले असे एकही दिवस झाले नाही. कारखाना सुरळीत चालत नसल्यामुळे गळीताचा प्रश्न गंभीर झाला आहे असे खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले.   

कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष दत्ता ढूस, कारखान्याचे संचालक, अधिकारी, कामगार यांच्यासमवेत संयुक्त बैठक झाली. गेल्या साडेचार वर्षांपासून तनपुरे कारखाना सुरळीत चालावा यासाठी मी आणि संचालक मंडळ आणि कामगारांनी प्रयत्न केले.

गेल्या दोन महिन्यांपासून हा कारखाना सुरू राहावा, वेळेवर गाळप व्हावे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न केले. परंतु अनेक अडचणी येत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही कारखाना होऊ शकत नाही, याबद्दल खेद वाटतो. हा कारखाना सुरळीत चालू नये, अशा काही शक्ती कार्यरत आहेत. त्यामुळे मानवनिर्मित दोष कारखान्यात आढळून येत आहेत. पुढील ७२ तासांत जर सुरळीत कारखाना सुरू झाला नाही, तर आम्हाला राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. संचालक मंडळाच्या या घोषणेमुळे खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here