मुठेवाडगांव : मुठेवाडगांव ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ग्रामविकास पॅनलचा प्रचार शुभाआरंभ ग्रामदैवत श्री संत तुळशीराम महाराजांना नारळ फोडून पार पडला. या पॅनलच्या वतीने तरुण नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे.तेव्हापासून गावामधे उत्साह पहायला मिळत आहे.प्रत्येक मतदाराच्या चेहर्यावर समधानाची भावना दिसून येत आहे.गावच्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन प्रामुख्याने काम करणार असल्याचे विश्वनाथ मुठे पाटील व पॅनलचे उमेदवार सागर मुठे पाटील यांनी सांगितले. तसेच गावातील रखडलेल्या प्रगतीला चालना देण्यास आपण कटीबद्ध आहोत जणू असा विश्वास त्यांच्या बोलण्यातून वारंवार जाणवत आला आहे.सर्वाना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती असल्याने सागर मुठे यांच्या बाबत चहूबाजूंनी सकारात्मक चर्चा रंगताना दिसून येत आहे.
तारुण्याच्या उंबरठ्यावर पासूनच यांची गावासाठीची तळमळ सर्वानी पहिली आहेच.गावातील गढूळ राजकारण जर स्वच्छ करायचे असेल तर आपल्याला ग्रामविकास पॅनलला विजयी करावे लागणार आहे ही मानसिकता सर्व ग्रामस्थ बाळगून आहेत. ज्यांना राजकारणामधे घोडा आणि गाढव यातील फरक कळत नाही अशांच्या हातात गावातील सत्ता गेली तर हे गावच्या हितवह ठरणार नाही.यासाठी सागर मुठे यांनी कंबर कसली आहे.गावात जर सामजिक एक्य प्रस्थापीत करायच असेल तर मतदारांना योग्य निर्णय घ्यावाच लागेल.जातपात विरहित आणि गटातटाचे राजकारण यापासून ग्रामविकास पॅनल नेहमीच आपल्याला दूर राहिलेला आहे. याचाही फायदा आणि जनमानसातील पाठिंबा नक्कीच महत्वपूर्ण ठरू शकतो.

एकजुटीची विचारधारा ही गोष्ट मतदार हेरल्या शिवाय राहणार नाही यात मात्र कुठेही तिळमात्र शंका दिसून येत नाही.विकासाचा दृढनिश्चय नेहमीच असणार आहे.हा आमचा शब्द नाही तर आम्ही सेवेत वचनबद्ध आहोत व गावासाठी सदैव एकसंध आहोत या भावनेने काम करणार आहे असे ते म्हणाले. त्याच बरोबर आपले मा.आमदार लहू कानडे यांच्या स्थानिक निधीतून 10 लाख रुपये च निधी मुठेवाडगांव खानपुर मेनरोड ते कचरु आप्पा मुठे यांच्या वस्ती पर्यंत तसेच विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खासदार निधीतून शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर पिव्हर ब्लॉक साठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे.अशी माहिती ग्रामविकास पॅनलचे तरूण तडफदार उमेदवार श्री सागर मुठे पाटील यांनी Express Marathi ला दिली.