मिशन २०२४: माजी उपपंतप्रधान स्वर्गीय चौधरी देवी लाल यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त आज म्हणजेच रविवारी भारतीय राष्ट्रीय लोकदलातर्फे फतेहाबाद येथे सन्मान दिन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला अनेक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मंचावर उपस्थित असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सीपीआय(एम) नेते सीताराम येचुरी आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.