केरळ पोलिसांना 2017 मध्ये माहिती मिळाली
अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2017 मध्ये केरळ पोलिसांना माहिती मिळाली होती की काही तरुण सीरियामध्ये स्थलांतरित झाले होते आणि काही जण ISIS सोबत त्याच्या जिहादमध्ये हातमिळवणी करण्याची योजना आखत होते आणि या प्रकरणातील बहुतेक आरोपी पीएफआयचे सदस्य होते. आखाती देशातून परतलेला हमजा हा केरळमधील तरुणांना ISIS मध्ये भरती करण्याचा कथित सूत्रधार होता. अधिका-यांनी सांगितले की त्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी, हमजाने योग्य PFI समर्थकांशी मैत्री केली जे आधीच देशविरोधी किंवा सत्ताविरोधी भावनांना आश्रय देत होते.