टाकळीमिया येथील लग्नसमारंभात दुधाची रबडी खाल्ल्याने विषबाधा

0
25
टाकळीमिया येथील लग्नसमारंभात दुधाची रबडी खाल्ल्याने विषबाधा

टाकळीमिया : अंदाजे ही संख्या शंभरच्या आसपास असावी .विषबाधा  झालेल्यांपैकी ३५-३६ जणांना विवेकानंद नर्सिंग होममध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे तर सुमारे पंचवीस  रुग्णांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयात ही काही रुग्णांवर उपचार सुरु आहेत. टाकळीमिया येथे दत्तात्रय यशवंत काळे व कोल्हार येथील कडस्कर कुटुंबीयांचे आज येथे लग्न समारंभ टाकळीमियात  वस्तीवर साजरा झाला.

सकाळी ११ पासूनच भोजनाची व्यवस्था होती . जेवण झाल्या नंतर तासाभराने काहींना पोट दुखणे, उलट्या आणि जुलाब होणे,चक्कर येणे  अशा तक्रारी सुरू झाल्या. प्रारंभी हा प्रकार काय आहे हे लक्षात आले नाही परंतु नंतर ही विषबाधा असल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने एकच धावपळ उडाली.रुग्णांना तातडीने विवेकानंद नर्सिंग होम मध्ये हालवण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास कड यांनी हे रुग्ण अन्नातून  विषबाधा असल्याचे सांगितले . विषबाधा झालेल्या मध्ये लहान मुलांचा समावेश अधिक आहे. विवेकानंद नर्सिंग होममध्ये दाखल झालेल्या पैकी अत्यवस्थ अवस्थेतील दोघांना लोणी येथील दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

राहुरीतील ग्रामीण रुग्णालय, देवळाली प्रवरा येथे ही काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सर्वांच्या जेवणात  दुधाची रबडी ही मिठाई होती. रबडीसाठी भेसळयुक्त  दुधाचा वापर झाल्याने ही विषबाधा झाली असल्याची  शक्यता वर्तवण्यात येत आहे .त्या दिशेने  देखील तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here