महाराष्ट्र पोलिस भरती 2022 आवश्यक माहिती
पोलिस भरतीची (Police bharti 2022 maharashtra) तयारी करणार्या आमच्या विद्यार्थी मित्रांनो आम्हाला माहीत की पोलिस भरतीसाठी तुम्ही फार अतोनात मेहनत करीत आहात मग ती ग्राऊंड ची तयारी असो व लेखी परीक्षेची दिवसरात्र तुम्ही अभ्यास करीत आहात व मेहनत करणार्याला यश नक्कीच मिळते. महाराष्ट्र पोलिस भरती 2022 जाहीर झाली असून भरतीच्या वेळी काही आवश्यक कागदपत्रे (Maharshtra police bharti 2022 important documents list) विद्यार्थ्यांना सादर करावी लागतात व जर ही कागदपत्रे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पोलिस भरती साठी अपात्र ठरवण्यात येते पण चिंता करू नका या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला पोलिस भरती साठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे सांगणार आहोत. पोलीस भरती कागदपत्रे 2022 ही अर्ज करण्याच्या अंतिम दिनांक च्या पूर्वीची असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र पोलिस भरती 2022 आवश्यक कागदत्रांची यादी Maharshtra police bharti 2022 important documents list
खाली दिलेली कागदपत्रे आवश्यक आहेत
- दहावी किंवा बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- कास्ट सर्टिफिकेट
- कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट
- संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून).
- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (ओबीसी प्रवर्गातील असल्यास)
- जर ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरीत असाल तर कास्ट सर्टिफिकेट ,कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट यांची गरज नाही
- EWS सर्टिफिकेट
- जन्म प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी अहवाल -असल्यास
- डिस्चार्ज प्रमाणपत्र माजी सैनिक असल्यास
- प्रकल्पग्रस्त असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र
- भूकंपग्रस्त असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र
- पोलीस पाल्य असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र
- अनाथ असल्यास त्याबाबत प्रमाणपत्र
- एनसीसी सर्टिफिकेट
- अंशकालीन प्रमाणपत्र
- आधारकार्ड (ऐच्छीक)
- प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ (Original) व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
- जात वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील.

तुमच्या मनातील काही शंका
1) डॉक्युमेंट्स वर स्पेलिंग मिस्टेक असेल तर काय करावे लागेल ? (police bharti 2022 maharashtra important documents list)
तुम्ही गॅझेट म्हणजेच राजपत्र बनवून घ्या.
2) महाराष्ट्र पोलिस भरती 2022 फॉर्म डबल भरू शकतो का ?
पोलीस भरती महाराष्ट्र (Police bharti 2022 maharashtra) फॉर्म भरताना एकदाच व्यवस्थितपणे भरायचा आहे. पोलीस भरतीच्या शासन निर्णयामध्ये म्हणजे जीआर मध्ये पोलीस भरतीचा फॉर्म डबल भरू नये असे नमूद करण्यात आलेले आहे.
3) सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल पाहिजे का झेरॉक्स पाहिजे ?
पोलिस भरती ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला ओरिजिनल किंवा झेरॉक्स स्कॅन करून अपलोड करायचे आहे परंतु तुमच्या फायनल सिलेक्शन नंतर तुम्हाला सर्व ओरिजिनल कागदपत्रे सादर करावी लागतील
4) महिला उमेदवाराचे लग्न झाले असल्यास नावात बदल झाल्यामुळे कोणते कागदपत्र पाहिजे ?
लग्न झाले असल्यास नावाचे गॅजेट कॉपी किंवा मॅरेज सर्टिफिकेट (विवाहित महिलांसाठी)
ही माहिती तुमच्या पोलिस भरतीच्या तयारी करणार्या सर्व मित्रांना शेअर करा व तुमच्या मनात आणखी काही शंका असतील तर खाली कमेन्ट करा आम्ही नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू.