Sanagmner News: सर्व खड्डे आठ दिवसाच्या आत बुजवा नाहीतर मनसे स्टाईल सामोरे जा असा खनखणीत इशारा.
संगमनेर: सिन्नर ( गुरेवाडी) पासुन ते संगमनेर टोल नाका पर्यंत सर्व खड्डे आठ दिवसाच्या आत बुजवा नाहीतर मनसे स्टाईल सामोरे जा असा खनखणीत इशारा सिन्नर तालुकाध्यक्ष विलास भाऊ सांगळे, उपाध्यक्ष संजय शेळके, संगमनेर मनसेचे तालुकाअध्यक्ष अशोक शिंदे, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष दिपक वर्पे, तुषार बढे, आकाश भोसले, मारुती आव्हाड, श्रीरंग आव्हाड यांनी दिला.
गुरेवाडी पासून संगमनेर टोल नाका व्यावस्थापन हद्द चालु होते परंतू नाशिक पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर दोन ते तीन फूटाचे खोल खड्डे पडलेले आहेत आणि त्यात सतत कोसळत असलेला पाऊस यामुळे वाहन धारकांना नागरिकांना त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे अपघाताला सामोरे जावे लागले तर काहींना आपला जीव गमवावा लागला. तसेच सर्व्हिस रोडची हितकी चाळण झाली आहे की, चालकाला खड्ड्यातून मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामध्ये गोंदे फाटा, खंबाळे फाटा, माळवाडी फाटा, दोडी, नांदुर शिंगोटे, मानोरी फाटा, शिंगोटे, मानोरी फाटा, निमोण नाका, कऱ्हे फाटा सिन्नर हद्द त्याचप्रमाणे संगमनेर हद्दीतील गुंजाळवाडी, कासारवाडी, खांडगाव, हिवरगाव पावसा ते घारगाव पर्यंत सर्वच सर्विस रोड खराब झालेले आहे. रस्त्यावरील बंद पडलेले पथदिवे लवकरच दुरुस्त करावे. सगळेच सर्व्हिस रोड मृत्यूचे सापळे बनले आहेत. जर याची दखल घेतली नाही तर टोल वसुली बंद करून नांदुर शिंगोटे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर व संगमनेर तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन मनसे स्टाईलने रस्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा सिन्नर मनसे तालुका अध्यक्ष विलास सांगळे व संगमनेर मनसे शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष दिपक वर्पे यांच्याकडून देण्यात आला.
Web Title: potholes on Nashik Pune highway and service road immediately or protest in MNS style