काय आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ?
आपल्या देशात बहुतेक महिला ह्या मोल मजुरी करून स्व:ताचा उदरनिर्वाह करतात यामुळे या महिला जेव्हा गरोदर असतात तेव्हा देखील त्यांना मोल मजुरी करून स्व:ताचा उदरनिर्वाह करावा लागतो परंतु यामुळे अशा गर्भवती महिलांना व त्यांच्या पोटात असणाऱ्या बाळाला त्यांच्या गरोदरपणात योग्य सकस पोषण आहार मिळत नाही परिणामी गर्भवती माता कुपोषित राहून त्याच्यावर व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे गर्भवती मातेचा व त्यांच्या पोटात असलेल्या नवजात बालकाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो.
मातांना त्यांच्या आरोग्य सुदृढ राहावे तसेच त्यांच्या होणाऱ्या बालकांचे सुद्धा आरोग्य सुदृढ राहावे याकरिता प्रयत्न करण्यात येतात. त्याचप्रमाणे बालमृत्यूच्या दरात घट झाली पाहिजे याकरिता आपल्या संपूर्ण भारत देशात ही योजना 2010 पासून राबविण्यात येत आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
2010 मध्ये कांग्रेस सरकारच्या काळात ही योजना “इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना” या नावाने राबविणे सुरू करण्यात आले. ही योजना म्हणजे भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणारा प्रसुती लाभ कार्यक्रम आहे. त्यानंतर 2017 मध्ये भाजपा सरकारने या योजनेला पुनर्निर्मित करून या योजनेचे नाव हे “प्रधानमंत्री मातृ वंदना योजना” हे ठेवण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत केंद्र शासनाचा ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना उद्देश
- नवजात जन्मलेल्या बालकाला कुपोषित होण्यापासून वाचविणे हा मातृ वंदना योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेअंतर्गत स्वतःचे पोट भरण्यासाठी गरोदरपणात सुद्धा काम करणाऱ्या मातेला तिच्या वेतनाची नुकसान भरपाई देणे जेणेकरून बाळाच्या प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीनंतर तिला आराम मिळेल.
- महिलेच्या गर्भपणात आणि तिच्या प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान करतेवेळी आई आणि बाळाच्या आरोग्यावर भर देणे.
- गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचे प्रसूती दरम्यान मृत्यूचे प्रमाण कमी करणे आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लाभ मिळवण्याच्या अटी
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे वय 19 वर्ष पूर्ण असणे आवश्यक.
- १ जानेवारी २०१७ किंवा त्या नंतर गर्भधारणा केलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत पात्र मानले जाईल.
- लाभार्थी या योजनेअंतर्गत फक्त एकदाच लाभ मिळवण्यासाठी पात्र आहे.
- पहिला हप्ता मिळाल्यानंतर प्रसूती दरम्यान मातेचा गर्भपात झाल्यास लाभार्थी महिला भविष्यात कोणतीही गर्भधारणा झाल्यास उर्वरित हप्त्यांवर दावा करण्यास पात्र असेल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत कोणाला लाभ मिळू शकतो ?
- १ जानेवारी २०१७ नंतर राज्यातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.
- मातृ वंदना योजना फक्त पहिल्या अपत्यापुरतीच असून या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल.
- जर एखाद्या महिलेचा नैसर्गिक गर्भपात झाला किंवा मृत बालक जन्मल्यास अशा परिस्थितीत देखील त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल.
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरील महिलांना घेता येईल.
- एखाद्या महिलेला तिच्या गर्भधारणेच्या वेळी वेतनासह मातृत्व रजा दिली जात असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- केंद्र सरकार आणि राज्य शासनात नियमित नोकरीं करत असलेल्या गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या माता या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे लाभ
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा मुख्य उद्देश आई आणि तिच्या बाळाची देखभाल करणे आहे त्यामुळे मातृ वंदना योजनेअंतर्गत शासनाने अधिसूचना केलेल्या संस्थेत अथवा शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस ३ टप्य्यात पहिल्या जीवित अपत्यापर्यंत ६000/- रुपये इतकी रक्कम लाभार्थी महिलेच्या थेट बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाते.
- सरकार पहिल्या टप्यासाठी १०००/- रुपये व दुसऱ्या टप्यासाठी २०००/- रुपये आणि तिसऱ्या टप्यासाठी २०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करते. व आई जेव्हा बाळाला रुग्णालयात जन्म देते त्या वेळेस जननी सुरक्षा योजना अंतर्गत उर्वरित १०००/- रुपये लाभार्थी महिलेला दिले जातात.
- पात्र लाभार्थ्याला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत संस्थात्मक प्रसूतीसाठी दिले जाणारे प्रोत्साहन मिळेल आणि जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मिळालेले प्रोत्साहन हे मातृत्व फायद्याकडे गणले जाईल जेणेकरून एका महिलेचा सरासरी ६000/- रुपये मिळतील.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी महिला व तिच्या पतीचे सहमती पत्र आवश्यक आहे.
- महिला व तिच्या पतीचे आधारकार्ड आवश्यक.
- लाभार्थी महिलेचे आधार संलग्न बँक खाते किंवा पोस्ट खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थाचे पासपोर्ट आकाराचे फोटो
- महिलेचा / पतीचा मोबाईल क्रमांक
- लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- घरपट्टी पावती
- वीजबिल रेशन कार्ड
“मातृ वंदना योजनेचा लाभ 3 टप्प्यात विभागला गेलेला आहे त्यामुळे लाभार्थ्यास 3 टप्याचा लाभ घेण्यासाठी त्या त्या टप्यानुसार लागणाऱ्या कागदपत्रांची आवश्यकता असेल”
१,२ आणि 3 टप्यातील अर्ज अंगणवाडी केंद्र / मान्यताप्राप्त आरोग्य सुविधेत सादर करणे आवश्यक आहे व भरलेल्या सादर अर्जाची पोचपावती घ्यावी.
पहिल्या टप्याचा लाभ मिळवण्यासाठी | अर्ज क्रमांक १ भरून त्या अर्जा सोबत MCP कार्ड (माता व बालसंरक्षण प्रमाणपत्र) व बँक / पोस्ट खात्याची माहिती देणे आवश्यक आहे. |
दुसऱ्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी | पहिल्या टप्यासाठी भरलेला अर्ज व गर्भधारणा झाल्यापासून ६ महिन्यानंतर प्रसुतीपूर्व किमान १ तपासणी (ANC) केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. |
तिसर्या हप्त्याचा दावा करण्यासाठी | लाभार्थ्याने रीतसर भरलेला फॉर्म १ सादर करणे आवश्यक आहे बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच बाळाला आवश्यक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्याची नोंद किंवा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. |
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत अनुदान लाभ व वितरण खालीलप्रमाणे
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत पात्र लाभार्थी गर्भवती महिलेस ५०००/- रुपये तिच्या बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात ३ टप्य्यात जमा केली जाईल.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पहिला हप्ता | मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता १०००/- रुपये प्राप्त करता येईल. |
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना दुसरा हप्ता | प्रसुतीपूर्व किमान १ तपासणी केल्यास व गर्भधारणा करून ६ महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता २०००/- रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. |
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना तिसरा हप्ता | मातृ वंदना योजना अंतर्गत तिसरा हप्ता मिळवण्यासाठी प्रसूती नंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी करावी लागते तसेच त्या जन्मलेल्या बालकास बीसीजी,ओपीवी,डीपीटी,हेप्टाईटीस बी लसीकरण द्याव्या लागतात त्यानंतर तिसरा हप्ता २०००/- रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. तसेच गर्भवती महिलेची एखाद्या शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ७००/- रुपये व शहरी भागात ६००/- रुपये लाभ दिला जातो. |
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ऑफलाईन अर्ज कसा करावा ?
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील / जिल्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र,तालुका आरोग्य-अधिकारी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा
- या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ 3 टप्यात दिला जातो त्यामुळे 3 अर्ज दिले जातात. हे 3 अर्ज त्या त्या वेळी विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून अर्ज जमा करावा व भरलेल्या अर्जाची पोचपावती घ्यावी.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अर्ज सादर करण्याबाबत व संपर्क कार्यालय
- ग्रामीण क्षेत्र: ग्रामीण भागात आरोग्य केंद्र सहाय्यक यांचे कडून सदर योजनेचा अर्ज दिला जाईल व स्वीकारला जाईल.
- नगरपालिका क्षेत्र: नगरपालिका क्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र सदर योजनेचा अर्ज वितरित करतील व स्वीकारतील.
- महानगरपालिका क्षेत्र: मुंबई तसेच इतर महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य केंद्र सहाय्यक पात्र लाभार्थी महिलेस अर्ज देऊन तो स्वीकारतील.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- Home Page वर गेल्यावर Login Form दिसेल Login Form मध्ये विचारलेले सर्व माहिती ( Email Id, Password, Captcha Code) भरून Login बटणावर क्लिक करावे.
- Login केल्यावर अर्जदार प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी अर्ज करू शकतो.
- अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती भरुन अर्ज सबमिट करावा.
अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करता येतो.