अहमदनगर- राहाता बाजार समितीत काल गुरूवारी झालेल्या मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त 4944 रुपये तर डाळिंबाला प्रतिकिलोला 150 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 4375 रुपये, जास्तीत जास्त 4944 रुपये तर सरासरी 4660 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या 867 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 रुपये ते 150 रुपये. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 120 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 36 रुपये ते 75 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 10 रुपये ते 35 रुपये भाव मिळाला.