अहमदनगर- श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याला 2400 रुपये इतका भाव मिळाला आहे. कांदा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली आहे. 13771 कांदा गोणी व 7537.71 क्विंटल आवक झाली. कांद्याचे बाजारभाव नंबर 1 कांदा 1400 ते 2400 रुपये क्विंटल, नंबर 2 कांदा 900 ते 1350 रुपये व नंबर 3 कांदा 300 ते 850 रुपये क्विंटल तसेच गोल्टी कांदा 950 ते 1450 रुपये बाजारभाव निघाले आहेत.
भुसार मार्केटमध्ये सोयाबीनचा लूजच्या जाहीर लिलावात 4501 रुपये इतका भाव निघाला आहे. तर बाजार समितीत सोयबीनची 156 क्विंटल आवक झाली असून 4300 ते 4501 रुपये तर सरासरी 4400 रुपये बाजारभाव निघाले आहेत.