उत्पादन म्हणजे का?www.marathihelp.com

उत्पादन म्हणजे उपभोगासाठी (आउटपुट) काहीतरी तयार करण्यासाठी विविध सामग्री इनपुट आणि अभौतिक इनपुट (योजना, माहिती) एकत्र करण्याची प्रक्रिया आहे. हे आउटपुट, चांगली किंवा सेवा तयार करण्याची क्रिया आहे ज्याचे मूल्य आहे आणि व्यक्तींच्या उपयुक्ततेमध्ये योगदान देते.

मानवी गरजा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पूर्ण करण्याची शक्ती असलेल्या वस्तूंची वा सेवांची निर्मिती. विज्ञानातील पदार्थ व शक्ती यांच्या अविनाशित्वाच्या सिद्धांतानुसार या विश्वात कोणत्याही नव्या पदार्थाची अथवा शक्तीची भर टाकणे मनुष्याच्या शक्तीपलीकडचे आहे. म्हणून वस्तू उत्पादन करणे म्हणजे निसर्गाने पुरविलेल्या पदार्थांत मनुष्याच्या गरजा तृप्त करण्याचे सामर्थ्य (उपयोगिता) उत्पन्न करणे होय.

निसर्ग मनुष्याला जो कच्चा माल पुरवीत असतो, त्याचे इष्ट वस्तूत रूपांतर करण्याचे काम मनुष्याला करावयाचे असते. मनुष्य उत्पादन करतो, तेव्हा तो उपयोगितेची निर्मिती करतो. ही निर्मिती रूपजन्य, स्थलजन्य आणि कालजन्य यांपैकी कोणत्याही प्रकारची असू शकते. पदार्थांच्या अंगी मनुष्याचा गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य येण्यासाठी त्यांना विशिष्ट रूप आणि आकार प्राप्त होणे आवश्यक असते. सोनार सुवर्णकणातून दागिने निर्माण करतो व सुतार लाकूड कापून व रंधून टेबलखुर्ची बनवितो, तेव्हा सोनार व सुतार रूप-उपयोगितेची निर्मिती करीत असतात. अनेकदा पदार्थ एके ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ज्या ठिकाणी त्या पदार्थांची कमतरता असते, तेथे ते पदार्थ हलवून त्यांत स्थल-उपयोगिता निर्माण करता येते. म्हैसूरमध्ये मिळणारे चंदन मुंबईला उपलब्ध करून देण्याने चंदनाची स्थल-उपयोगिता वाढते. मनुष्याच्या गरजा पूर्ण होण्यासाठी त्याला वस्तू हव्या त्या वेळी उपलब्ध करून देणे, हेदेखील महत्त्वाचे असते. आज तयार झालेल्या वस्तूला कालांतराने उत्पन्न होणारी गरज पूर्ण करण्याचे जे सामर्थ्य लाभते, त्याला काल-उपयोगिता म्हणतात. हंगामात काढलेली पिके कोठारात ठेवून बाराही महिने विकली जातात किंवा फळे, मासे यांसारख्या नाशवंत वस्तू हवाबंद डब्यात ठेवल्या जातात, तेव्हा काल- उपयोगितेची निर्मिती होत असते उपयोगिता.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 16:48 ( 1 year ago) 5 Answer 7259 +22