भांडवल बाजारात किती काळासाठी कर्ज दिले जाते?www.marathihelp.com

सर्व प्रकारचे गैर बँक व्यवहार आणि 13 महिन्यापेक्षा जास्त मुदतीचे व्यवहार भांडवली बाजारात होतात. भांडवली बाजाराचा विकास करणाऱ्या वित्त संस्थांचा समावेशही भांडवली बाजारात केला जातो.

भांडवल बाजार –
भांडवल बाजार म्हणजे अशी यंत्रणा जेथे दीर्घ मुदतीचे भांडवली व्यवहार होतात. (भारतीय भांडवल बाजार)

सर्व प्रकारचे गैर बँक व्यवहार आणि 13 महिन्यापेक्षा जास्त मुदतीचे व्यवहार भांडवली बाजारात होतात. भांडवली बाजाराचा विकास करणाऱ्या वित्त संस्थांचा समावेशही भांडवली बाजारात केला जातो. याठिकाणी दीर्घकालीन वित्त पुरवठ्याच्या केंद्रांचा विकास होतो तेथे भांडवली बाजारांचे अस्तित्व निर्माण होते. गैर बँक वित्त बाजारात, गैर बँक आणि खातेदार यांच्या तर दीर्घ मुदतीचे व्यवहार होतात. भारतीय भांडवल बाजार भाग एक या मध्ये आपण भारतातील गैर बँकिंग विविध संस्थांचा आढावा घेणार आहोत.

भारतीय भांडवल बाजार ची रचना –

पुढील चार भागांमध्ये भारतीय भांडवल बाजाराचे रचना केली जाते.

1) गिल्ट एज्ड बाजार
2) औद्योगिक रोखे बाजार
3) विकास वित्तीय संस्था
4) मध्यम वित्तीय संस्था

1) गिल्ट एज्ड बाजार –
शासकीय रोख्यांच्या खरेदी-विक्रीच्या बाजाराला गिल्ट एज्ड बाजार म्हणतात. आर्थिक विकासासाठी शासनाला भांडवलाची आवश्यकता असते. भांडवल उभे करण्याच्या दृष्टीने शासन बाजारात शासकीय कर्ज रोखे विकून दीर्घकालीन कर्ज उभारते, या बाजाराला गिल्ट एज्ड बाजार म्हणतात. शासकीय कर्जरोखे दोन प्रकारची असतात. ट्रेझरी बिले आणि दीर्घकालीन रोखे. ट्रेझरी बिल एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी काढले जातात. 91 दिवस, 181 दिवस, 364 दिवस कालावधीच्या बिलांचा समावेश यामध्ये असतो. दीर्घकालीन रोखे एका वर्षापेक्षा जास्त मुदतीचे असतात.

2) औद्योगिक रोखे बाजार –
औद्योगिक रोखे बाजारांमध्ये विविध कंपन्या आपले विविध उपक्रम स्थापन करण्यासाठी शेअर्स विक्री च्या माध्यमातून किंवा डिबेंचर्स बाँड्स इत्यादी विकून दीर्घकालीन निधीची उभारणी करतात. याला औद्योगिक रोखे बाजार असे म्हणतात. यामध्ये नवीन रोखे बाजार व व विद्यमान रोखे बाजार असे दोन प्रकार दिसून येतात.

3) विकास वित्तीय संस्था –
भांडवली बाजाराच्या विकासासाठी भांडवली बाजाराला पतपुरवठा करणाऱ्या विकास वित्तीय संस्थांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील विकास वित्तसंस्था व राज्य स्तरावरील विकास वित्त संस्था अशा दोन प्रकारच्या संस्थांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:53 ( 1 year ago) 5 Answer 6742 +22