मराठी साहित्यात वात्रटिका लिहिणारे कवी कोण?www.marathihelp.com

वात्रटिका : एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार. पश्चिमी ‘लिम्‌‌रिक’ या पद्यप्रकाराचा मराठी अवतार म्हणजे वात्रटिका होय. साधारणपणे चार-पाच ओळींत चमकदार, विनोदी कल्पना अथवा चुटका वात्रटिकेत गुंफलेला असतो. आशयाच्या अथवा कल्पनाविस्ताराच्या दृष्टीने कधीकधी सहा ते आठ ओळींचीही वात्रटिका असते.

मुं. शिंदे, रामदास फुटाणे इ. कवींनी वात्रटिका हा प्रकार विशेषत्वाने हाताळला आहे. त्यातही रामदास फुटाणे यांचे राजकीय-सामाजिक व्यंग्यपर वात्रटिका-वाचनाचे जाहीर प्रयोग खूपच लोकप्रिय ठरले आहेत.

मराठीमध्ये ‘वात्रटिका’ या काव्यप्रकाराचे मूळ साधारणपणे १९५४ च्या आसपास सदानंद रेगे यांनी लिहिलेल्या ‘किंचित काव्य’ या प्रकारात आढळते. पण हा काव्यप्रकार मुख्यत्वे प्रतिष्ठित केला, तो ⇨मंगेश पाडगावकर यांनी. त्यांचा वात्रटिका हा संग्रह १९६४ मध्ये प्रसिद्ध झाला. सामान्यपणे त्यांच्या वात्रटिकांची सुरुवात –‘एक होती/आहे…’ या वाक्यांशाने होते व व्यक्ती वा स्थळ या नावाने पहिल्या ओळीचा शेवट होतो. मंगेश पाडगावकरांनी बाई, बाटली, ब्रह्मचारी, पुजारी, मुका, काका, न्हावी, निजाम, शेटजी, गवई, पंडित, शायर, पुढारी, पोपट, कावळा, कोकिळा, पावटा, बेदाणा अशा असंख्य विषयांवर वात्रटिका रचल्या. नमुन्यादाखल पाडगावकरांची ‘नाते’ ही वात्रटिका पाहता येईल :

 ‘एक आहे पाववाला 

तो माझा गाववाला 

एक म्हातारी विकते भाजी 

ती माझ्या एका दोस्ताची आजी 

आणि एक आहे समोर देखणी बाई 

ती मात्र अजून माझी कोणी नाही’

गंमतीशीर यमके, विक्षिप्त व वैचित्र्यपूर्ण अशी कल्पनाचमत्कृती, अतिशयोक्ती, विडंबन, मिस्किलपणा, थट्टेखोरपणा, मर्मांवर बोट ठेवण्याची वृत्ती, अधूनमधून द्वयर्थी वाक्यरचना ही त्यांच्या वात्रटिकांची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. अलीकडे फ. मुं. शिंदे, रामदास फुटाणे इ. कवींनी वात्रटिका हा प्रकार विशेषत्वाने हाताळला आहे. त्यातही रामदास फुटाणे यांचे राजकीय-सामाजिक व्यंग्यपर वात्रटिका-वाचनाचे जाहीर प्रयोग खूपच लोकप्रिय ठरले आहेत.

खरे तर वात्रटिका हा अँग्लो-अमेरिकन संस्कृतीचा एक भाग पण या वात्रटिकांचा जगभराच्या अनेक भाषांमध्ये संचार दिसतो. परिणामी त्या जागतिक संस्कृतीचाच एक भाग बनलेल्या आहेत. वात्रटिका जरी लिखित रूपात अवतरत असल्या, तरी त्यांचे तालबद्ध ठेक्यात जाहीर वाचन होऊ शकते. त्यांचे मूळ रूप हे मौखिक असल्याने या यंत्रयुगात लोककाव्याचा हाच कदाचित शेवटचा जिवंत प्रकार म्हणता येईल.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 3940 +22