युद्धानंतर जर्मनीचे विभाजन कसे करण्यात आले?www.marathihelp.com

युद्धानंतर जर्मनीचे विभाजन कसे करण्यात आले?
युरोपमधील दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आणि मित्रराष्ट्रांच्या उद्योगाच्या कालावधीनंतर म्हणजे शीतयुद्धाच्या काळात जर्मनीची फाळणी होऊन दोन नवीन जर्मन देश स्थापन झाले: पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी...

फाळणी ते एकीकरण (इ.स. १९४५ - इ.स. १९८९)

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीची प्रचंड हानी झाली. युद्धसमाप्तीपर्यंत जर्मनीचा भूभाग ४ देशांनी व्यापला होता. या चार राज्यकर्त्यांनी बर्लिनला चार भागांमध्ये विभागले. त्यांपैकी तीन भाग जे ब्रिटन, फ्रान्स व अमेरिकेच्या ताब्यात होते ते एकत्र करून मे २३, १९४९ रोजी त्याचे पश्चिम जर्मनी (Federal Republic of Germany - FRG) असे नामकरण करण्यात आले, तर ऑक्टोबर ७, १९४९ रोजी सोविएत संघाच्या ताब्यातील भाग पूर्व जर्मनी (German Democratic Republic - GDR) म्हणून जाहीर करण्यात आला.

पश्चिम जर्मनीने अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सच्या संयुक्त मदतीने महायुद्धानंतर झपाट्याने आर्थिक प्रगती केली, तर पूर्व जर्मनीने सोविएत महासंघाच्या पावलावर पाऊल टाकून आर्थिक व सामाजिक वाटचाल केली. परिणामतः पूर्व आणि पश्चिम जर्मनीदरम्यान ४० वर्षांत खूप मोठा आर्थिक फरक निर्माण झाला. पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत पळून जाणाऱ्यांना रोखण्यासाठी इ.स. १९६१ मध्ये बर्लिनची भिंत उभारण्यात आली. परंतु या भिंतीने इ.स. १९६० व १९७० च्या दशकांत शीतयुद्धादरम्यान अमेरिका आणि सोविएत महासंघातील तेढ वाढवण्याचेच काम केले.

इ.स. १९८० च्या दशकात पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत होणाऱ्या स्थंलातराचा प्रश्न गंभीर झाला. परिस्थिती जरा निवळावी म्हणून पूर्व जर्मनीने इ.स. १९८९ मध्ये स्थलांतरासंदर्भातील निर्बंध कमी केले. परिणामतः जर्मनीच्या एकीकरणाला चालना मिळाली. सरतेशेवटी ऑक्टोबर ३, १९९० रोजी पूर्व व पश्चिम जर्मनी पुन्हा एकत्र झाले. ऑक्टोबर ३ हा दिवस जर्मनीत आता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 6158 +22