व्यवसाय म्हणजे काय?www.marathihelp.com

वस्तूंचा वा सेवांचा समाजाला पुरवठा करणारी व्यवस्था. व्यवसायाचा संबंध आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्थांशी असतो. व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या विभिन्न क्रियांचा नागरिकांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाशी निकटचा संबंध असतो. व्यवसाय या संज्ञेमध्ये संपत्ती निर्माण करण्याच्या तसेच संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश होतो. मात्र केवळ संपत्तीची निर्मिती वा संपादन हे व्यवसायाचे एकमेव उद्दिष्ट नव्हे, तर सामाजिक उपयोगितेच्या दृष्टीने मानवी गरजांची पूर्तता करणे, हेही व्यापक उद्दिष्ट असते. व्यवसाय या सुसंघटित प्रक्रियेचे दोन पक्ष असतात व त्या दोहोंचे परस्परहित साधणे आवश्यक असते.

व्यवसायामध्ये एकमेकांच्या फायद्यासाठी वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण केली जाते. व्यवसाय ही सातत्याने व अखंडपणे चालणारी व पुनरावृत्त होणारी क्रिया असल्याने एखाद्या व्यक्तीने महिन्याकाठी, वर्षाकाठी किंवा संपूर्ण आयुष्यात एखाद-दुसऱ्या वेळी ही क्रिया केल्यास तिला व्यवसाय असे म्हणता येणार नाही. सतत वाढत जाणाऱ्या असंख्य मानवी गरजा भागविण्याच्या उद्देशाने उत्पादनाचे घटक संघटित करून व्यवसायामार्फत वस्तूंची वा सेवांची निर्मिती केली जाते. एका व्यक्तीने किंवा संघटनेने नफा मिळावा यासाठी आर्थिक क्रिया केली की, त्यास व्यवसायाचे स्वरूप प्राप्त होते.

व्यवसाय ही संस्था केव्हा उगम पावली, हे जरी निश्चितपणे सांगता येत नसले, तरी शेकडो वर्षांपासून अनेक व्यवसाय चालू होते. सोळाव्या शतकातील यूरोपमध्ये व्यापारी क्रांती, अठराव्या शतकातील विविध तांत्रिक शोध, एकोणिसाव्या शतकातील औद्योगिक क्रांती व विसाव्या शतकातील यांत्रिकीकरण यांमुळे व्यवसायाची व्याप्ती व विस्तार फार मोठ्या प्रमाणावर वाढत गेल्याचे दिसून येते. सुरुवातीच्या काळात व्यवसाय व्यक्तिगत पातळीवर चालविला जात असे; परंतु जसजसे व्यवसायाचे विस्तारमान वाढू लागले, तसतसे भागीदारी संस्था व्यवसाय निगम, सहकारी संस्था, सार्वजनिक उपक्रम यांच्या माध्यमांतून व्यवसाय करण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.



व्यवसायाचे प्रकार :-

क्षेत्रा नुसार व्यवसायाचे प्रकार :

खाजगी उद्योग
सरकारी उद्योग

व्यवसायाच्या आकारमाना नुसार प्रकार :

मोठे उद्योग (मल्टि नॅशनल कंपनी)
मध्यम उद्योग
लघु उद्योग
घरगुती उद्योग

संस्था पद्धतीनुसार व्यवसायाचे प्रकार :

सहकारी संस्था
संयुक्त भांडवली संस्था
भागीदारी संस्था
व्यक्तिगत संस्था

उत्पादना नुसार प्रकार :

शेती उद्योग (Agriculture Business)
मूलभूत उद्योग (Primary Industries)
पूरक उद्योग (Supplementary Industries)
सेवा उद्योग (Service Industries)

आर्थिक क्रियांच्या आधारे व्यवसाय प्रकार :

प्राथमिक क्रिया – ज्या क्रियां मध्ये माणूसा कडून नैसर्गिक स्त्रोतांचा थेट वापर केला जातो आणि आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो, त्या सर्व क्रिया प्राथमिक क्रिया म्हणून संबोधले जाते. उदाहरण :- इमारती लाकूड तोडणे, वन उपक्रम,पशुसंवर्धन,शेतीविषयक कामे,मत्स्यपालन इत्यादी .

दुय्यम क्रिया – या क्रियां मध्ये नैसर्गिक स्त्रोतांचा थेट वापर केला जात नाही. उलट, निसर्गाने प्रदान केलेला माल पुनर्निर्मित करून वापरला जातो. जसे की कापसापासून कापूस बनवणे, लोखंडा पासून स्टील, लाकडापासून फर्निचर,गव्हाचे पीठ इ.

तृतीय क्रिया – या क्रियां मध्ये समाजाला प्रदान केलेल्या सेवांशी संबंधित क्रिया समाविष्ट असतात. जसे की शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यापार, रहदारी,टेलीकॉम,खाद्यपदार्थ घरपोहच करणे इ. सारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित सेवा.

चतुर्थ क्रिया – ज्या क्रियां मध्ये समाजाचा विकास करण्या हेतूने कार्य केले जाते,त्या सर्व क्रियांना चतुर्थ क्रिया म्हणून संबोधले जाते उदाहरणार्थ संशोधन कार्य, वैज्ञानिक, कलाकार, नेतृत्व, पुरस्कार इ.

व्यवसायाचे ठिकाण

ग्रामीण भागातील व्यवसाय.
शहरी भागातील व्यवसाय.

solved 5
व्यवसाय Monday 5th Dec 2022 : 14:29 ( 1 year ago) 5 Answer 4177 +22