
अहमदनगर- जिल्हा सत्र न्यायाधीश गोसावी यांच्यासमोर आज, (सोमवार) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे खून प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात आली होती. दरम्यान सुनावणी झाली नाही. आता पुढील सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी आरोप निश्चिती होण्याची शक्यता आहे.
रेखा जरे खून प्रकरणातील प्रमुख सूत्रधार बाळ बोठे याच्यासह 12 आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपींवरील आरोप निश्चितीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी सोमवारी सुनावणी ठेवण्यात आली होती.
यासह या खटल्यातील तीन आरोपी जनार्दन चंद्राप्पा अकुला, शेख इस्माईल शेख अलीम व अब्दुल रहमान अब्दुल अरिफ (तिघे रा. हैद्राबाद) या तिघांनी खटल्यातून वगळण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
या अर्जांवरही आता 12 ऑक्टोबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे.