अहमदनगरचे नाव बदला; खासदार लोखंडे यांची मागणी

0
79
अहमदनगरचे नाव बदला; खासदार लोखंडे यांची मागणी

अहमदनगर : औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करा या जोरदार मागणीनंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करावे अशी मागणी लोखंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. मात्र शहरांच्या नामकरणाबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहरांची नावे बदलण्यापेक्षा शहरांच्या विकासाबाबत विरोधकांनी बघावे असे वक्तव्य थोरात यांनी काही दिवसापूर्वी केले होते.

अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करण्याबाबत राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असे यावेळी लोखंडे यांनी पत्रकारांना  संगितले.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here