
अहमदनगर- पतीनेच आपल्या पत्नीचे अश्लिल व्हिडीओ नातेवाईकांच्या व्हॉट्सअपवर टाकून बदनामी केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यात घडली. पत्नीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पारनेर तालुक्यातील असलेल्या फिर्यादी यांच्या पतीने 14 जुलै, 2022 रोजी सकाळी त्याच्या मोबाईलमधील व्हॉट्सअपवरून फिर्यादीचे मामा, मावस भाऊ व दाजी यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर फिर्यादीचे अश्लिल व्हिडीओ व इतर रेकॉर्ड केलेले व्हिडीओ पाठविले.
यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होऊन बदनामी झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सायबर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.