
अहमदनगर- कर्जत येथील एका युवतीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून त्या अकाऊंटद्वारे त्या युवतीला अश्लिल फोटो व व्हिडीओ पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित युवतीने याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी बनावट अकाऊंट तयार करणार्या अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. एकाने युवतीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान या बनावट अकाऊंटवरून फिर्यादी युवतीला अश्लिल मेसेज व अश्लिल व्हिडिओ पाठविले.
सदरचे व्हिडीओ व फोटो पाहिल्याने युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तसेच फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. सदरचा प्रकार युवतीच्या लक्ष्यात आल्याने तिने सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.