एक्स्प्रेस मराठी | मुंबई : गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-खोपोली जलद लोकलचा (Chhatrapti Shivaji Maharaj terminus to Khopoli fast local train) मोठा अपघात मोटरमन अशोक शर्मा (Motermen Ashok Sharma) यांच्या सतर्कतेने टळला.
याबाबत सविस्तर बातमी असे की मशीद स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर अज्ञात व्यक्ती द्वारे दगडांनी भरलेले पिंप ठेवण्यात आले होते. जलद लोकलच्या रेल्वेरुळांवर गुरुवारी दुपारी मशीद स्थानकाजवळ दगडाने भरलेला पिंप पाहताच मोटरमन अशोक शर्मा यांनी आपत्कालीन ब्रेक (Emergency breakes) लावले. मात्र, गाडी वेगात असल्याने लोकल त्या पिंपाला धडकली आणि ते पिंप लोकलखाली आले. पिंपाला धडक बसून मोठा आवाज झाल्याने प्रवासी देखील घाबरले.
दरम्यान, मोटरमन यांनी अशोक (Motermen Ashok Sharma) यांनी प्रवाशांच्या मदतीने पिंप बाहेर काढले मात्र, मोटरमन अशोक शर्मा यांच्या प्रसंगावधानामुळे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-खोपोली जलद लोकलचा मोठा अपघात टळला. याप्रकरणी भायखळा येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध ठाण्यात कलम १५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, मशीद आणि वाडी बंदर येथील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
(Web title : Shocking! Pimps full of stones placed on railway tracks; A major accident was averted due to the vigilance of the motorman ashok sharma)