
अहमदनगर- सावत्र बापाने अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल हावभाव करत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. अहमदनगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून पीडित मुलीच्या बापाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यांना एक मुलगी आहे. ती नगर शहरातील विद्यालयात शिक्षण घेते. फिर्यादी मुलीसह दुसर्या पतीसोबत उपनगरात राहतात.
29 सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सावत्र बापाने अश्लिल हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. फिर्यादी यांनी त्याला समजवून सांगितले असता त्याने त्यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सावत्र बाप त्याच्या मुलीसोबत वारंवार असे कृत्य करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.