अबबं ! चोरट्यांनी चक्क एसपी ऑफीसच्या शेजारचीच पान टपरी फोडली

0
18
Ahmednagar news
Image credit goes to respective owners

अहमदनगर : आजकाल वाढत्या चोरया आपण बघतच आहोत पण आता चोरट्यांची हिम्मत फारच वाढलेली दिसते असच काही अहमदनगर जिल्ह्यात घडलं आहे. चोरट्यांनी चक्क अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय (Ahmednagar SP Office) लगतची पान टपरी फोडली आहे. अज्ञात चोरट्यांनी ही पान टपरी फोडून वीस हजार रुपये व अन्य वस्तु जसे की सिगरेट इत्यादि चोरी केले आहे. चोरट्यांनी चक्क अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय (Ahmednagar SP Office) च्या प्रवेशद्वारा शेजारी ही पान टपरी आहे. रविवारी रात्री पान टपरीचे मालक टपरी बंद करून घरी गेले व जेव्हा ते सोमवारी टपरी उघडन्यासाठी आले त्यावेळेस त्यांना मागचा दरवाजा उघडा दिसला त्यानंतर त्यांनी टपरी मध्ये पाहणी केले असता त्यांच्या लक्षात आले की फोडून वीस हजार रुपये व अन्य वस्तु जसे की सिगरेट, पान इत्यादि चोरी झाले आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर पोलिसांनी श्वान पथक (Dog Squad) बोलावून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी चक्क एसपी ऑफिस शेजारी चोरी केल्याने चोरट्यांमध्ये पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.          

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here