
अहमदनगर- संत नागेबाबा मल्टिस्टेट सोसायटीमध्ये बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणाची व्याप्ती वाढतच आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी दिवसभरात आणखी 13 जणांची 32 खाती तपासण्यात आली. त्यात दोन किलो 10 ग्रॅम वजनाचे बनावट दागिने आढळून आले. त्याव्दारे 69 लाख तीन हजार रूपयांचे कर्ज घेण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
शहर बँकेत सुमारे साडेनऊ किलो बनावट दागिने आढळले आहेत. त्याव्दारे बँकेची साडेतीन कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर नागेबाबा मल्टिस्टेट सोसायटीमध्ये सुमारे अडीच किलो वजनाचे बनावट दागिने आढळून आले. त्याव्दारे 79.19 लाखांची फसवणूक झाली आहे. आता आणखी कर्जदारांची खाती तपासली केली जात आहेत. त्यामुळे फसवणुकीचा आकडा वाढत आहे.
दरम्यान, नागेबाबा सोसायटीत आत्तपर्यंत साडेचार किलो बनावट दागिने आढळून आले असून, फसवणुकीची रक्कम सुमारे दीड कोटींवर पोहचल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.