अहमदनगर- नगर शहर व परिसरातून दुचाकी चोरी करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. संदीप उर्फ पिंट्या पांडरंग खेडकर (वय 41रा. घाटशिळ पारगांव, शिरुर कासार, ता. शिरुर, जि. बीड) व सागर उर्फ पप्पू वसंत गिते (वय 23 रा. लोहसर खांडगांव ता. पाथर्डी) अशी पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून दोन लाख वीस हजार रुपये रुपये किंमतीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. शिवाजी अर्जुन साबळे (वय 40 रा. इंदिरानगर, भिंगार) यांची होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी सिव्हील हॉस्पीटल पार्किगमधुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली होती. साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासाबाबत पोलीस अधीक्षक यांनी जिल्हयामध्ये दुचाकी चोरीचे प्रकार वाढत असल्याने गुन्हयांचे गांर्भीर्य लक्षात घेऊन अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये मा. श्री. अनिल कटके साो. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे (1)संदीप उर्फ पिंटया पांडरंग खेडकर व त्याचा साथीदार (2) सागर उर्फ पप्पू वसंत गिते असे काळया रंगाच्या स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक एम.एच.20 ई झेड 5101 या चोरीच्या मोटार सायकलवरुन पाथर्डीवरुन अहमदनगर कडे येत आहेत. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यान त्यांनी सदर माहिती सपोनि श्री. दिनकर मुंडे यांना सांगून स्टाफसह जाऊन खात्री करुन कारवाई करणेबाबतचे आदेश दिल्याने सपोनि/दिनकर मुंडे, सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/बापूसाहेब फोलाणे, पोना/शंकर चौधरी, दिलीप शिंदे, भिमराज खर्से, पोकॉ/योगेश सातपुते, पोकॉ/विनोद मासाळकर, चापोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी नगर पाथर्डी रोडवरील चॉदबीबी महाल पायथ्याशी सापळा लावून थांबलो असता पाथर्डी कडुन अहमदनगरकडे दोन इसम बातमीतील नमुद वर्णनाच्या मोटार सायकलवरुन येत असल्याची खात्री झाल्याने जवळ येताच आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता आम्हास पाहुन ते पळुन जाण्याच्या प्रयत्नात असतांनाच आम्ही त्यांना 13/00 वा. जागेवरच पकडले.
आम्ही त्यांना आमची ओळख सांगून त्यांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे (1) संदीप उर्फ पिंटया पांडरंग खेडकर, वय 41, रा. घाटशिळ पारगांव, शिरुर कासार, ता. शिरुर, जिल्हा बीड (2) सागर उर्फ पप्पू वसंत गिते, वय 23, रा. लोहसर खांडगांव, ता. पाथर्डी, जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे त्यांचे ताब्यात असलेल्या मोटार सायकलचे कागदपत्र व ड्रायव्हींग लायसनबाबत विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी करता त्यांनी कळविले की, आम्ही दोघांनी सदरची मोटार सायकल ही सिव्हील हॉस्पीटल, अहमदनगर आवारातून चोरी केलेली आहे व त्यांनी अहमदनगर शहरातून व परीसरातून आणखी 07 अशा एकुण 08 मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले.