राहुरी कृषि विद्यापीठाच्या वॉचमनचा आढळला मृतदेह ! नातेवाइकांनी केले गंभीर आरोप

2
69

राहुरी : राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठात ड्यूटीवर असणार्‍या एका वॉचमनचा मृतदेह आढळून आला आहे. चंद्र्कांत चव्हाण असे या वॉचमनचे नाव असून मंगळवारी पहाटेच्या वेळेस रमाजी शिंदे ह्या वॉचमनला चंद्र्कांत चव्हाण यांचा मृतदेह आढळून आला शिंदे यांनी लगेच चव्हाण यांच्या घरच्यांना याबाबत माहिती दिली व चव्हाण यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी चव्हाण यांना उपचारपूर्वीच मृत घोषित केले.

सतत दहा वर्षापासून एकाच ठिकाणी रात्रपाळीची ड्यूटी लागत असल्यामुळे चव्हाण हे तणावग्रस्त झाले होते व याच कारणामुळे त्यांची पत्नी घर सोडून निघून गेली होती. या रात्रपाळीच्या ड्यूटीमुळे त्यांचा संसार मोडला होता. असे चव्हाण यांच्या नातेवाइकांनी संगितले. चव्हाण यांचा मृत्यू नेमके कशामुळे झाला हे तर शवविछेदनानंतर कळेल असे डॉक्टरांनी संगितले. चव्हाण यांच्या मृत्यू हा फक्त कृषि विद्यापीठाच्या अधिकार्‍यांमुळे झाला आहे असे गंभीर आरोप नातेवाइकांनी केले आहे. पुढील तपास राहुरी पोलिस स्टेशनचे हवालदार बर्हाटे हे करीत आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here