Shrirampur Suicide News: तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेलापूर रोड गायकवाडवस्ती येथे घडली.
श्रीरामपूर: एका २० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बेलापूर रोड गायकवाडवस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बेलापूर रोड, गायकवाड वस्ती येथे मुळा-प्रवरा वीज संस्था कामगार पतपेढीच्या इमारतीससमोर रस्त्याच्या कडेला राहणारे शांताराम गायकवाड यांचा मुलगा आर्यन शांताराम गायकवाड (वय 20) याने काल पहाटे राहत्या घरासमोरच्या पत्र्याच्या शेडला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तो याठिकाणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. आर्यन याने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या अहवालावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Youth committed suicide by hanging himself in his residence